Sunday, 4 August 2019

शिदोरी

एक एक श्वास मोजत
प्रवास चालू आहे
अवतीभोवती काही घटना घडताहेत
पाहूच नयेत अशा
नाईलाज तर आहेच
भेटतात सावाबरोबर काही ... ...
जाणिवांची नजर आणि कातडी बंद करून कासवाच्या अवयवासारखी आत ओढता आली असती तर निदान म्हणता आले असते, *"नरो वा कुंजरो वा"* 
साक्षीदार तर व्हावेच लागेल
मनात असो नसो,
पण काळ्या यादीत नाव नाही आपले
हे समाधान सुद्धा खूप मोठं आहे.
आणि जगण्यासाठी ऊरात उरलेली हिंमत
*पोह्यांच्या बदली आपण दिलेल्या मैत्रीच्या  शिदोरीचच पोहोच आहे.*
हे विसरण्याइतकी कृतघ्नता
जमली नाही
अजूनतरी !
               *©रमेश*

No comments:

Post a Comment