Sunday, 4 August 2019

मैत्रीची नवी गाठ


वेळ सकाळची साडे अकरा-बाराची.
खटाव येथील मोरया हाॅलमध्ये २७ जुलैला घेतलेल्या मानसशास्त्रीय कसोट्यांचा (निकाल) परिणाम पाहण्यासाठी त्या परिसरातील हायस्कूल व ज्युनिअर काॅलेजमधील दहावी/बारावीचे विद्यार्थी तसेच शिक्षक व पालक अशा हजारेक लोकांची घाई-गडबड चालली होती.
            मुलांना आवडीच्या क्षेत्रातच संधी दिली तर पालकांचा पैसा, विद्यार्थ्यांचे श्रम आणि दोघांचाही वेळ कसा वाया जातो याबाबत चर्चा चालू होती.
          नेमके व्यवसाय समाधान म्हणजे काय? हा घटक घेऊन वाट चुकलेल्या अनेक दिग्गजांचे उदाहरण दिले. पद,प्रतिष्ठा, पैसा यापेक्षा मानसिक समाधान महत्त्वाचे आहे.
माझा संवाद संपला.
दरम्यान सर्व सोबत्यांनी नाश्ता केला होता.
दुपारचे दोन वाजले होते.
मलाही नाश्त्यासाठी हाॅलच्या पलीकडे असलेल्या डायनिंग हाॅलमध्ये संयोजक घेऊन गेले.
नाश्ता करत असताना एक युवक हाॅलमधून उठून जवळ आला. माझ्याकडे निरखून पाहात म्हणाला,
"आपण निकाडे सर? "
"हो."
"नवनाथ हायस्कूल पोहाळे "
"हो."
"सर मला ओळखलंत?"
"क्षमस्व,नाही."
"कसे ओळखणार, सर मी आपल्या शाळेत आलो होतो. सन २००९/१० मध्ये यशवंत बी.एड.काॅलेज,कोडोली येथे प्रशिक्षणाला होतो.आपल्या शाळेत झालेल्या पाक्षिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. शाळा खूप आवडली... " वगैरे गप्पा झाल्या. नाश्ता संपत आला होता. तो बिगीने दूर अंतरावर असलेल्या पिंपातील पाणी पेल्यातून प्यायला घेऊन आला.
सध्या तो लक्ष्मीनारायण हायस्कूल खटाव येथे शिक्षक म्हणून सेवा करत आहे. आणि खूप आनंद झाला.
व्यवसाय समाधान ते हेच. दहा वर्षानंतरही ओळख ठेवून अल्पकाळाचे विद्यार्थी विचारपूस करतात.
सौजन्यानेआदराने नम्र होतात. तो पाक्षिक शाळेच्या कामकाजाच्या निमित्ताने घरीही येऊन गेला होता. ज्याच्याबरोबर फोटो घ्यायचा मोह आवरला नाही तोच हा *माणिक काशीद*
मैत्रीची नवी गाठ बांधून आम्ही विचारांची देवाण-घेवाण करण्याचा निश्चय करून एकमेकांचा निरोप घेतला.

No comments:

Post a Comment