Sunday, 4 August 2019

घोडा आणि झेब्रा

झूल अंगावर पांघरून
मंचावर उभारलेल्या घोड्याला
झेब्रा म्हणून
टाळ्या पिटतील दर्शक क्षणभर
यात दर्शक, घोडा किंवा झेब्रा यांचा काय दोष !
ज्यांनी झेब्रा पुरवण्याची सुपारी घेतली
त्या मोतद्दाराची नियत खराब म्हणून
त्याने झेब्रा शोधण्याचे कष्ट टाळण्यासाठी
असा बनाव मांडला
मित्रहो! आपण एक करा
कुठे झेब्रा दिसलाच तर,
त्याला गाढव म्हणू नका
कारण...
तो त्याचाच नाही
अखिल झेब्रा जातीचा व त्याच्या कुलातील सर्व सजीव प्राण्यांचा अपमान आहे
आणि एक
सावधान! अशा मोतद्दारापासून जे सुपारी घेतात
न जाणो तुमच्याही अवतीभवती
उद्यापावेतो पोहोचतील
कोणत्याही रुपात
काय भरवसा !

       रमेश

No comments:

Post a Comment