. *दीपज्योती*
आज दिव्यांच्या
जळती वाती
तमास तोडून
जोडीत नाती
आज फटाके
फोडीत कोणी
सोडीत जड
क्रोधाच्या गोणी
आज तिळाचे
तेल लावुनी
विकार लोपवी
स्नेहे मर्दुनी
आज सुगंधी
उटणे हाती
तशी दरवळो
आपली ख्याती
आज तेजाने
उजळो जीवन
आणि वाहूदे
भरलेले मन
*आज* येऊदे
रोज जीवनी
या हृदयाची
हीच मागणी
*रमेश*
No comments:
Post a Comment