Doodle ...
गेल्या आठवड्यात एका पुस्तकाच्या कामासाठी गुरुवर्य बाळ पोतदारसर,बिद्री. यांच्याकडे गेलो असता त्यांनी बाजारात नव्यानेच आलेल्या ब्रश पेनबद्दल माहिती दिली. तशी कलेची आवड थोडीशी मनात आहेच. तिने उचल खाल्ली. परतताना कोल्हापूर बाजारात ब्रश पेन घ्यायचेच असे ठरवले. आम्ही नेहमी ज्या दुकानात स्टेशनरी घेतो तेथे हे पेन नव्हते.अनेक ठिकाणी फिरल्यानंतर एका दुकानात हे बारा रंगछटांतील बारा ब्रश पेन मिळाले. झाले आता फावला वेळ मिळण्याची गरज होती. काल शाळा सुटल्यानंतर थोडासा वेळ मिळाला आणि मग या ब्रश पेनच्या थीन टोकाने सहज रेखाटन केले. बघा आवडतं का आपल्याला. एक जादूच आहे प्रत्यक्ष दिसायला स्केचपेन सारखे असले तरी केसाळ ब्रशच्या टोकासारखे लवचिक असल्यासारखे दोन टोके या ब्रश पेनला आहेत. एक बोल्ड व दुसरे थीन. खूप मजा येईल चित्र काढायला.पाणी नको, डिश नको. रंग कालवण्याची कटकट नाही की छटा बदलल्याची काळजी नाही. फक्त कागद आणि हे पेन आज फक्त थीन टोकने केलेले रेखाटन आहे.
Wednesday, 2 October 2019
Doodle
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment