Sunday, 8 March 2020

हे नारी

   तू मान्य कर

हे नारी तू नाहीस
कुठली राणी, 
निर्गुण देवी,
असहाय्य अबला, 
आजन्म वंचिता,
क्षुद्र अभागिनी, 
घोर शापिता
आणि भोगवस्तू 
कुण्या नरासाठी
फेकून दे ही लक्तरे
स्वार्थी-आपमतलबी पुरुषांनी
बहाल केलेली

तू आहेस 
स्वयंप्रकाशी तेजःपुंज,
विश्र्वाची निर्माती,
एकमेवाद्वितीय,
परम श्रेष्ठ गुणनिधी,
अचूक गुणकारी मात्रा
आणि तू
फक्त तू आहेस

कात टाकल्याशिवाय 
नाही मिळणार
नवं तेजाळलेपण
हेही तू मान्य कर

रमेश


No comments:

Post a Comment