Tuesday, 24 March 2020

तुका नसे

तुका नसे फक्त
वाचायाची गाथा
वंदनीय माथा
ओवीओवी ।

संत कनवाळू
रोकडा उदार
त्याच्याहून थोर
अन्य नसे ।

आकाशा एवढा
मांगल्याची मूर्ती  
काय वाणू कीर्ती
तुकयाची ।

भक्त भागवत
विज्ञानी डोळस 
म्हणून कळस
झाला आहे ।

------------- नीजानुभवानंद

No comments:

Post a Comment