Monday, 30 March 2020

वटवाघूळ

,

         खरंतर वटवाघुळ हे नाव सुद्धा कोणाला माहीत नव्हतं पण कोरोना आल्यापासून सर्वांच्या तोंडी वटवाघुळचं नाव यायला लागलंय ना ?
         परवा एकदा घरात बसल्या बसल्या सर्वांची वटवाघुळाबद्दल चर्चा चालू होती. इतक्यात दूरदर्शन वर वटवाघुळ जलाशयात पोहत-पोहत बाहेर येत असल्याची क्लिप दाखवली छोटा मुलाने विचारले, "हा पक्षी पोहतो कसा काय ?"
          मोठा मुलगा म्हणाला, "अरे, तो पक्षी नाही पशू आहे. सस्तन प्राणी आहे."
         लगेचच छोट्याने प्रतिप्रश्न केला, "दादा मग पक्षी आणि पशू कसा ओळखायचा ?"
         दादा, "सोपं आहे. ज्याला चोच असते तो पक्षी आणि त्याला चार पाय असतात तो प्राणी. बहुतेक सर्व पक्षी आपापल्या घरट्यात अंडी घालतात. त्यांना शरीराची ऊब देतात. ठराविक काळानंतर या अंड्यांमधून पिलांचा जन्म होतो. या पिल्लांची पूर्ण वाढ होईपर्यंत पक्षी पिलांना अन्न पुरवतात.
           "पशुंमध्ये मात्र पोटातच पिल्लांची वाढ होते. तेही ठराविक कालावधीनंतर पिलांना जन्म देतात. त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत अंगावर दूध पाजतात. पिलांना दूध पाजण्यासाठी दर्या प्राण्यांना सर्जन असतात त्यांना समर्थन पक्ष्यांची म्हणतात."
        "मग वटवाघूळ हवेत उडतो कसा ?"
        "वटवाघुळाचे मागचे आणि पुढचे पाय पातळ कातडीच्या पडद्याने जोडलेले असतात. त्या पडद्यांचा उपयोग पंखासारखा करून तो हवेत झेपावतो, उडत राहतो. पाण्यात गेल्यावर त्याच पडद्यांचा वल्ह्यासारखा उपयोग करून पोहोच जातो वटवाघुळ याप्रमाणेच पाकोळी या या प्राण्याला सुद्धा पशु ला सुद्धा मागच्या व पुढच्या दोन पायामध्ये पातळ कातडीचा पडदा असतो तोही त्यांचा उपयोग करून हवेत संचार करतो.
           "पक्ष्यांची हाडे पोकळ असतात म्हणे, त्यामुळे त्यांना हवेत उडण्यास मदत होते."
           "पाकोळी ला पण पाण्यात पोहता येते का ?"
           "पाकोळी पाण्यात पोहत नाही; पण पाण्यावर फिरणारे कीटक पकडण्यासाठी वरच्यावर घिरट्या मात्र घालंत असते.
           "बदक हा पक्षी देखील आपल्या पायाच्या बोटांमध्ये असलेले कातडीचे पडदे वल्ह्यासारखेच वापरून पाण्यात पोहत असतो. त्याला पंख असूनही हवेत फार उंच किंवा अधिक वेळ हवेत उडता येत नाही."
         " दादा, माशांनाही पाण्यात पोहण्यासाठी पंख असतात ?"
         "असतात. त्यांना पर म्हणतात."
         "बदका प्रमाणे कोंबडी, लांडोर या पक्ष्यांना देखील पंख असून फार उंच उडता येत नाही ना ?"
         " होय, अजूनही असे काही पक्षी व पशू असतील त्यांची माहिती घ्यायला हवी. चला आता भूक लागलीय. आपल्याला पंख नाहीत चालत-चालत स्वयंपाक घरापर्यंत जायला हवं."
            

No comments:

Post a Comment