सन २००८ मध्ये रमाकांत मोहंतो (ओडीसा) यांची योगायोगाने भेट झाली. घडले असे...
प्रा.डाॅ.सुनिलकुमार लवटेसर यांच्या प्रयत्नाने, नियोजनातून केंद्रीय हिंदी संस्थेचे सात दिवसांचे *हिंदीत्तर हिंदी भाषिक नवलेखक शिबीर* महावीर महाविद्यालय येथे आयोजिले होते.
या शिबिरात भारतातील विविध प्रदेशातून पंचवीस लेखक सहभागी झाले होते. त्यातील एक निसर्गप्रेमी म्हणजेच *रमाकांत मोहंतो*
मोहंतो सरांनी शाळेला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते आॅक्टोबर महिन्यात वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेतला होता. त्यांनी स्वत: काही बिया आणल्या होत्या. त्यात एक कंद होता. तो शाळेच्या आवारात ध्वजस्तंभाजवळ लावला. बाकी बिया उगवल्या. रोपटी डोलायला लागली पण त्या कंदाच्या जागेवर मात्र काही उगवल्यावर जाणवत नव्हते.
एप्रिल महिन्यात अचानक या पाहुण्यांनी जमिनीतून मान वर काढली. सुरवातीला फक्त एक पोपटी रंगाची टोपी घातलेली चपटी सुरळी वर आली. आमची उत्सुकता वाढली. दररोज निरीक्षण सुरू झाले. सात-आठ दिवसात ती फूटभर वाढली आणि अचानक एक दिवस त्या टोपीमधून हळूच एक कळी डोकाऊ लागली. दुसऱ्याच दिवशी केशरी रंगाच्या पाकळ्या डोलायला लागल्या.
. दुसऱ्याच दिवशी केशरी रंगाच्या पाकळ्या डोलायला लागल्या. एक-दोन करता-करता चांगल्या चार पाच कळ्या त्या चपट्या सुरळीवर उमलल्या. हा काय चमत्कार ! असे वाटत असताना एका विद्यार्थ्यांला मोहंतो सरांनी लावलेल्या कंदाची आठवण करून दिली.
ऐन उन्हाळ्यात उमललेल्या त्या केशरी फुलांनी आनंदाचे वातावरण पसरले.
रमाकांत सरांनाही ही गोड बातमी सांगितली. महिनाभर अशा सात-आठ पोपटी/हिरव्या सुरळ्या आणि त्यांच्या डोक्यावरील टोपीतून तीस पस्तीस फुले उमलून गेली. पुढे पावसाळ्यात निशिगंधाच्या झुडपासारखे हिरव्या लांबट पानांचे झुडूप त्या ठिकाणी वाढले. नोव्हेंबरच्या दरम्यान मात्र त्याची सर्व पाने गळून गेली. अगदी भुईसपाट जागा दिसत होती. एप्रिल उजाडला आणि पुन्हा तो चमत्कार झाला.
तेव्हापासून एप्रिल महिना जवळ येऊ लागला की शाळा सुटल्यानंतर मुलांचा घोळका त्या ठिकाणी जमायचा. अचानक एखाद्या दिवशी मुलांच्या टाळ्यांचा कडकडाट ऐकायला यायचा आणि आम्हीही या पाहुण्यांच्या स्वागताला जायचो.
गेली आठ-दहा वर्षे हा स्वागतोत्सव सुरू आहे. पण याचे नाव मात्र आम्हास नक्की माहिउत नाही. कोणीतरी *मे फ्लाॅवर* म्हटले. पण त्याची फुले तर गोलाकार असतात. मित्रवर्य मिलिंद यादव (कोल्हापूर) यांनी जोपसलेले मे फ्लाॅवरचे रोपटे व फूल मी पाहिले आहे. मग...
या पाहुण्याचे नाव एप्रिल लीली
No comments:
Post a Comment