. *किल्ला*
छोड यार चिंता
यावर्षीच्या किल्ला स्पर्धेत
आपलाच किल्ला पहिला असेल
तुला चेष्टा वाटते
... ...
अरे केवळ स्पर्धेत
हुबेहूब किल्ला बनवायचा
म्हणून मी तीन दिवस
अवघा प्रतापगड पालथा घातला आहे.
तिथले बुरूज, महाल, नगारखाना, अंबरखाना, दारूकोठार
इतकंच नाही तर
पाण्याची टाकीही बघून घेतलीत.
... ...
हा ती इतिहासाची चिंता सोड
त्यासाठीच तर पन्नास पुस्तकं चाळलीत.
... ...
ऐकायचं तुला... ऐक
शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम सोळाशे छप्पनला पूर्ण झाले
सन १६८९ मध्ये छत्रपती राजाराम महाराज याच गडावर वास्तव्यास होते १६५६ ते १८१८ या काळात काही महिने सोडल्यास हा किल्ला शत्रूपासून अभेद्य राहिला आणि याच याच किल्ल्यावरील सतरा फूट उंचीच्या शिवाजी महाराजांच्या ब्रांझच्या पुतळ्याचे उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते १९५७ मध्ये झाले.
या गडाच्या पायथ्याशी महाराजांनी अफजलखानाशी झुंज दिली आणि पहाड का चुहा म्हणणाऱ्या अफजल खानाचा पाडाव केला.
महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून भवानी मातेची मूर्ती घडवून घेतली तिची स्थापना केली
या गडावरील मंदिरात महाराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे
केदारेश्वर मंदिर, जिजाऊंचा महाल, शासकीय विश्रामधाम,
रेडका बुरुज, यशवंत बुरुज, सूर्य बुरुज,
किल्ल्यावरून दिसणारे जावळीच्या खोऱ्यात चे विहंगम दृश्य आणखी काय माहिती हवी तुला ?
... ...
तू मला किल्ला बांधायला मदत करणार की नाही एवढंच सांग.
... ...
नाही राहू दे बाबा
बांध तू
तुझा स्वतंत्र किल्ला बांध.
पण लक्षात ठेव किल्ला स्पर्धेचा निकाल आल्यावर पश्चाताप करत बसू नकोस
एक चांगली संधी देतोय आम्ही तुम्हाला
संधीचं सोनं करायचं की माती
तुमच्याच हातात आहे
... ...
ते बघ तू नसलं म्हणून काय फरक पडणार नाही
चिल्या पिल्या राजा बाजा
हे माझे साथीदार एका पायावर तयार आहेत
फक्त मी बोलवायचा अवकाश
... ...
सैनिक आणि मावळे ?
अरे ५० मावळ्यांची फौज उभी करणार आहे मी किल्ल्यावर
शिवाय बुरुजावर तोफा शामियाना आणि प्रत्यक्ष
अफजलखानाचा भेटीचा प्रसंग उभा करणार आहे मी
अशी आरोळी ठोकीन
क्षत्रिय कुलावंतस राजाधिराज छत्रपती शिवाजी राजे मल्हार रहे है
... ...
जा... जा बघ ना तुझं तू निदान शुभेच्छा तरी देऊन जा.
No comments:
Post a Comment