Friday, 4 December 2020

इतकेच तुला : गझल (व्हल्गार)

(गझलचा बाप सुरेश भट यांची क्षमा मागून)

इतकेच तुला खाताना 
सरणावर कळले होते
गुटक्याने केली सुटका 
जगण्याने छळले होते.

     ही दुनिया पाषाणांची 
     चघळून बदलली नाही
     तू बहर इथे माव्याचे 
     नुसतेच उधळले होते.

गेलेल्या आयुष्याच्या 
व्यसनास गडे विसरू या
पाजून कधी पाण्याची 
माघारी वळले होते.

     तू पेटवली तेव्हाही तर 
     त्याची तीच बिडीही
     मी नाव तुझे तेव्हाही 
     गुपचूप वगळले होते

नुसतीच तिच्या पेल्यांची 
एकांती खडबड झाली
नुसतेच रिते हृदयाशी तू 
ग्लास कवळले होते.

     याचेच रडू आले की 
     दिसले न तुला थडगेही
     तू रंग तुझ्या स्वप्नांचे 
     मद्यात मिसळले होते.

घर त्याचे शोधायाला 
त्यालाही फरपट झाली
जे दार खुले दिसले ते 
त्यालाच न कळले होते

     तो एकटाच त्या रात्री 
     मौजेने ढोसत होता
     तो विझला तेव्हा सारे 
     झोकात डोलले होते.
                   *चाँद परछाई*                          
                      *(व्हल्गार)*

No comments:

Post a Comment