Saturday, 16 January 2021

म्हणी १

असतील शिते तर जमतील भूते एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो
अडला हरी गाढवाचे पाय धरी एखाद्या बुद्धीमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा जो मनुष्य फार शहाणपणा करायला लागतो त्याचे मुळीच काम होत नाही
अति तेथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसान कारक असतो
अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची त्याशिवाय आणखीनही काही गोष्टी मागून मिजास दाखवणे.
अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाज गरजवंताला अक्कल नसते
अंगावरचे लेणे, जन्मभर देणे दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेरीत बसायचे.
अंत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण मरण्याच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात.
अंधारात केले, पण उजेडात आले कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच
अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे नाव मोठे लक्षण खोटे
अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था अशक्यकोटीतील गोष्टी
अती झाले अन आसू आले एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते
अतिपरिचयात अवज्ञा जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो
अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच
अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घास अन्न न खाणे;पण त्यात मन असणे
अपापाचा माल गपापा लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते.
अर्थी दान महापुण्य गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते.
आईची माया अन् पोर जाईल वाया फार लाड केले तर मुले बिघडतात
आधी पोटोबा मग विठोबा प्रथम पोटाची सोय पाहणे, नंतर देव – धर्म करणे
आपलेच दात आपलेच ओठ आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते.
आयत्या बिळावर नागोबा एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे.
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे
आपण हसे लोळायला, शेंबूड आपल्या नाकाला ज्या दोषाबद्दल आपण दुसर्‍याला हसतो, तो दोष आपल्या अंगी असणे
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक, अवस्था निर्माण होणे.
आंधळं दळतं कुत्रं पिठ खातं एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.
आंधळ्या बहिर्यांची गाठ एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणार्‍या दोन माणसांची गाठ पडणे.
अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी ? चूक स्वतःच करून ती मान्य करावयाची नाही, उलटी ती दुसऱ्याच्या माथी मारून मारून मोकळे व्हायचे.
अडली गाय फटके खाय एखादा माणूस अडचणीत सापडला, की त्याला हैराण केले जाते.
आपला हात जगन्नाथ आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.
असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्यादिवशी शिमगा अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे.
अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते.
अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप अतिशय उतावळेपणाची कृती.
अती खाणे मसणात जाणे अति खाणे नुकसानकारक असते.
अठरा नखी खेटरे राखी, वीस नखी घर राखी मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते.
अवचित पडे, नि दंडवत घडे स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे.

No comments:

Post a Comment