वनराज वनी व्याकुळला
ही वेळ कशी ही आली
मित्राची आठवण झाली
एकटाच सिंह अभागी
संकटात सापडलेला
राहिले दूर घरदार
तरसांनी हल्ला केला
भवताली घालती फेरे
कुणी मागून कोणी पुढती
चुकवून कुणी नजरेला
कडकडून चावे घेती.
मग काय करावे तेव्हा
समजेना त्या सिंहाला
एकटाच गडबडलेला
डरकाळून हतबल झाला
सोबती एक रानात
तो आला धावत जवळी
पाहून पळाली दूर
मग तरसांची ती टोळी
राजा असो वा रंक
पाहिजे मित्र त्यालाही
संकटात द्याया धीर
सांगते हीच नवलाई
अनुतनय
No comments:
Post a Comment