Saturday, 16 January 2021

म्हणी २

अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे एकमेकांच्या अगदी विरुद्ध बाजू.
अंथरूण पाहून पाय पसरावे आपली ऐपत, वकूब पाहून वागावे.
अंगापेक्षा बोंगा मोठा मूळ गोष्टींपेक्षा अनुषांगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे.
आपला तो बाब्या दुसर्याचे ते कारटे स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे.
आपली पाठ आपणास दिसत नाही स्वतःचे दोष स्वतःला कधीच दिसत नाहीत.
आजा मेला नातू झाला एखादे नुकसान झाले असता, त्याच वेळी फायद्याची गोष्ट घडणे.
आत्याबाईला जर मिशा असत्या तर नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे.
आपल्याच पोळीवर तूप ओढणे फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे.
आलिया भोगासी असावे सादर तक्रार व कुरकुर निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
आवळा देऊन कोहळा काढणे आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे.
आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही अनुभवाशिवाय शहाणपण नसते.
आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकुन दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे.
आधीच तारे, त्यात गेले वारे विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे.
आधीच मर्कट तशातही मद्य प्याला आधीच करामती व त्यात मद्य प्राशन केल्याने अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण होते.
अडक्याची अंबा आणि गोंधळाला रुपये बारा मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टींचाच खर्च जास्त असणे.
आग रामेश्वरी, बंब सोमेश्वर रोग एकीकडे, उपाय भलतीकडे.
आयजीच्या जीवावर बायजी उदार दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.
आग खाईल तो कोळसे ओकेल जशी करणी तसे फळ
आठ पूरभय्ये नऊ चौबे खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा चार बुद्धिमान पुरेसे.
आधणातले रडतात व सुपातले हसतात संंकटात असतानाही दुसर्‍याचे दुःख पाहून हसू येते.
इकडे आड तिकडे विहीर दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे.
इच्छा परा ते येई घरा आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे.
इच्छिलेले जर घडते तर भिक्षूकही राजे होते इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते.
इन मीन साडेतीन एखाद्या करण्यासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे.
ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच.
उथळ पाण्याला खळखळाट फार अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो.
उंदराला मांजर साक्ष ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे.

No comments:

Post a Comment