Saturday, 16 January 2021

म्हणी ९

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मार्गात एक सारख्या अनेक अडचणी येतात
नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नये नदीचे उगमस्थान व ऋषीचे कूळ पाहू नये कारण त्यात काहीतरी दोष असतोच.
न कर्त्याचा वार शनिवार एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो.
नऊ दिवस कोणत्याही गोष्टीचा नवीन पणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्त्व नाहीसे होणे.
नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे केलेला उपदेश निष्फळ ठरणे. पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचा प्रकार. उपदेशाचा शून्य परिणाम होणे.
नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे एकाचे लुटून दुसऱ्याला दान करणे
नाकापेक्षा मोती जड मालकापेक्षा नोकर शिरजोर असणे
नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाव मोठे लक्षण खोटे.
नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे देवाच्या नावाने स्वार्थ जपणे.
नाक दाबले, की तोंड उघडते एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य दिशेने दबाव आणला, की चुटकीसरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येते.
नागव्यापाशी उघडा गेला, सारी रात्र हिवाने मेला आधीच दरिद्री असणाऱ्याकडे मदतीला जाणे.
नागिन पोसली आणि पोसणाराला डसली वाईट गोष्ट जवळ बाळगल्या वर ती कधी ना कधी उलटतेच
नाकापेक्षा मोती जड मालकापेक्षा नोकराचे प्रतिष्ठा वाढणे
नाचता येईना अंगण वाकडे आपल्याला एखादे काम करता येत नसेल तेव्हा आपला कमीपणा लपविण्यासाठी संबंधित गोष्टीत दोष दाखवणे
नावडतीचे मीठ आळणी आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट किती चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते
निंदकाचे घर असावे शेजारी निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो त्यामुळे आपले दोष कळतात
नेसेन तर पैठणी (शालू) च नेसेन, नाही तर नागवी बसेन अतिशय हटवादीपणाची वर्तन करणे
पळसाला पाने तीनच सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे
पडलेले शेण माती घेऊन उठते एखाद्या चांगल्या माणसावर काहीतरी ठपका आला आणि त्याने किती जरी निवारण केले तरी त्याच्या चारित्र्यावर थोडा का होईना डाग हा पडतोच
पदरी पडले पवित्र झाले कोणती गोष्ट एकदा स्वीकारली कितीला नाव ठेवणे उपयोगाचे नसते
पायाची वाहन पायीच बरी मूर्ख माणसाला अधिक सन्मान दिला तर तो शेफारतो.
पाचामुखी परमेश्वर बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे
पाप आढ्यावर बोंबलते पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही
पाची बोटे सारखी नसतात सर्वच माणसे सारख्याच स्वभावाची नसतात
पायलीची सामसूम चिपट्याची धामधूम जिथे मोठी शांत असतात तेथे छोट्यांचा बडेजाव असतो
पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही
पाहुनी आली आणि म्होतुर लावून गेली पाहुणे म्हणून येणे आणि नुकसान करून जाणे
पी हळद नि हो गोरी कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे
पुत्र मागण्यास गेली भ्रतार नवरा घालवून आली फायदा होईल म्हणून जाणे परंतु नुकसान होणे
पुढच्याच ठेच मागचा शहाणा दुसऱ्याच्या अनुभवावरून मनुष्य काही बोध घेतो व सावधपणे वागतो
पुढे तिखट मागे पोचट दिसायला फार मोठी पण प्रत्यक्षात तसे नसणारे
पै दक्षिण लक्ष प्रदक्षिणा पैसा कमी काम जास्त
पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरीभिरी स्वतः जवळच असणारी वस्तू शोधण्यासाठी इतरत्र फिरणे
पोर होईल ना व सवत साहिना आपल्याकडून होत नाही व दुसऱ्यालाही करू द्यायचे नाही
फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय राजाने दिलेला न्याय मनाविरुद्ध असला किंवा चुकीचा असला तरी तो मानावा लागतो
फुले वेचली तिथे गोवर्या वेचणे जेथे सुख भोगले तेथे वाईट दिवस पाहण्याचे नशिबी येणे
फुल ना फुलाची पाकळी वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे
फुटका डोळा काजळाने साजरा करावा आपल्या अंगचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो तो झाकता येईल तितका झाकावा
बडा घर पोकळ वासा दिसण्या श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव
बळी तो कान पिळी बलवान मनुष्य इतरांवर सत्ता गाजवितो
बकरीचे शेपूट माशाही वारीना व लाजही राखीना निरुपयोगी गोष्ट
बाप से बेटा सवाई वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार
बाप तसा बेटा बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे
बावळी मुद्रा देवळी निद्रा दिसण्यास बावळट पण व्यवहारचतुर माणूस
जारात तुरी भट भटणीला मारी काल्पनिक गोष्टीवरुन भांडण करणे
बारक्या फणसाला म्हैस राखण ज्याच्या पासून धोका आहे त्याच्याकडे संरक्षणाची जबाबदारी सोपविणे
बुडत्याला काडीचा आधार घोर संकट काळी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्त्वाची ठरते
बैल गेला आणि झोपा केला एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते
बोलेल तो करेल काय केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही
बोडकी आली व केस कर झाली विधवा आली अन लग्न लावून गेली
भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी एखाद्याला आश्रय दिला तर तो त्यावर समाधान न मानता अधिक फायदा घेण्याचा प्रयत्न करतो

No comments:

Post a Comment