उंदराला मांजर साक्ष ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे.
उचलली जीभ लावली टाळ्याला दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे.
उठता लाथ बसता बुक्की प्रत्येक कृत्याबद्दल आदर घडविण्यासाठी पुन्हापुन्हा शिक्षा करणे.
उडत्या पाखराची पिसे मोजणे अगदी सहज चालता – चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे.
उतावळी बावरी (नवरी) म्हातार्याची नवरी अति उतावळेपणा नुकसान कारक असतो.
उद्योगाचे घरी रिद्धी – सिद्धी पाणी भरी जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते.
उंबर पिकले आणि नडगीचे (अस्वलाचे) डोळे आले फायद्याची वेळी येणे; पण लाभ न घेता येणे.
ऊराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे अतिशय हलाखीची स्थिती.
उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.
उकराल माती तर पिकतील मोती मशागत केल्यास चांगले पीक येते.
उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला? एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो.
उचल पत्रावळी, म्हणे जेवणारे किती? जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे.
उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पहावी लागते.
उधारीची पोते, सव्वा हात रिते उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो.
उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे श्रीमंती आली की, तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारेही येतातच.
उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे येते वेळी ताठ मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे.
उसाच्या पोटी कापूस सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संपत संतती.
ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खाऊ नये कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
No comments:
Post a Comment