भरवशाच्या म्हशीला टोणगा ज्या व्यक्तीवर अति विश्वास आहे नेमक्या अशाच व्यक्ती कडून विश्वासघात होणे
भित्यापाठी ब्रह्मराक्षस बिद्री व्यक्ती काही कारण नसताना भीत असते
भिंतीला कान असतात गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहात नाही
भीड भिकेची बहीण उगाच मनात भीती बाळगून आपण एखाद्याला नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येणे
भीक नको पण कुत्रा आवर एखाद्याच्या मनात नसले तर त्याने मदत करू नये परंतु निदान आपल्या कार्यात अडथळा आणू नये अशी स्थिती
भागीचे घोडे की किवणाने मेले भागीदारीतील या गोष्टीचा लाभ सर्वच घेतात काळजी मात्र कोणीच घेत नाही
मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये
मनात मांडे पदरात धोंडे केवळ मोठ मोठी मनोराज्य करायचे परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती
मनी वसे ते स्वप्नी दिसे ज्या गोष्टींचा आपण सतत ध्यास लागलेला असतो ती गोष्ट स्वप्नात दिसणे
नाही पण जण्याची तरी असावी एखादी वाईट कृत्य करताना म्हणाला काही वाटले नाही तरी जगाला काय वाटेल याचा विचार करावा
मन जाणे पाप आपण केलेले पाप दुसऱ्याला कळाले नाही तरी ज्याचे त्याला ते माहीत असतेच
मन राजा मन प्रजा हुकुम करणारे आपले मनच ते पाळणारे ही आपली मनच असते
माणकीस बोललं, झुणकीस लागलं एकाला बोलणे अन् दुसऱ्या लागणे
मामुजी मेला अन् गांव गोळा झाला क्षुल्लक गोष्टीचा गवगवा करणे
मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाही आई वडिलांचे बोलणे लेकराच्या हिताचेच असते
मानेवर गळू आणि पायाला जळू रोग एकीकडे उपाय भलतीकडे
मारुतीची शेपूट लांबत जाणारे काम
मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू छोट्याशा गोष्टींनीही हुरळून जाणे
मुंगीला मुताचा पूर लोकांना लहान संकट ही डोंगराएवढी वाटते
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात लहान वयातच व्यक्तीच्या गुणदोषांचे दर्शन होते
मूर्ख लोक भांडते वकील घरी बांधते मूर्खांचे भांड अन् तिसऱ्याचा लाभ
म्हशीला मणभर दूध मेल्यावर गुणगान करणे
म्हातारीने कोंबडे लपविले म्हणून उजडायचे राहत नाही निसर्ग नियमानुसार ज्या घटना घडायच्या त्या घडतातच म्हशीचे दुध काढतांना आधी आचळाला दूध लागावे लागते फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते
No comments:
Post a Comment