यथा राजा तथा प्रजा सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्यांचे किंवा वरिष्ठांचे अनुकरण करतात
या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे बनवाबनवी करणे
रे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या एखाद्याने केलेला उपदेश ऐकून न घेता पूर्वीप्रमाणेच वागणे
ये रे कुत्र्या खा माझा पाय आपण होऊन संकट ओढवून घेणे
रंग जाणे रंगारी ज्याची विद्या त्यालाच माहीत
रात्र थोडी सोंगे फार कामे भरपूर पण वेळ थोडा असणे
रडत राऊत रडत राव घोड्यावर स्वार इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे
रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत मुख्य गोष्टीचा अभाव
राईचा पर्वत करणे मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असता तिचा विपर्यास करून सांगणे
राज्याचे घोडे आणि खासदार उडे वस्तू एकाची मिजास दुसऱ्याची
रोज मरे त्याला कोण रडे तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य नष्ट होते व तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही
लग्नाला वीस तर वाजंत्री ला तीस मुख्य कार्य पेक्षा गौण कार्यालाच खर्च अधिक लष्कराच्या भाकर्या भाजणे बिन फायद्याचा आणि निरर्थक उद्योग करणे
लकडी दाखविल्या शिवाय मकडी वळत नाही धाका शिवाय शिस्त नाही
लग्नाला गेली आणि बारशाला आली अतिशय उशिराने पोहोचणे
लंकेत सोन्याच्या विटा दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो
लाज नाही मला कोणी काही म्हणा निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही
लेकी बोले सुने लागे एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे
लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण लोकांना उपदेश करायचा पण स्वता मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही
No comments:
Post a Comment