हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते आजार, संकटे येतात ती लवकर आणि मोठ्या प्रमाणावर येतात पण कमी होताना हळूहळू कमी होतात
हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्यांच्या पावसाळा खोटे अश्रू ढाळणे
हत्तीच्या दाढे मध्ये मिऱ्याचा दाणा मोठ्या उपायांची गरज असताना अतिशय छोटे उपाय करावे
हत्ती गेला पण शेपूट राहिले कामाच्या बहुतेक भाग पूर्ण झालं आणि फक्त थोडे शिल्लक राहिला
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसर्याला देणे स्वतःला झीज लागू न देणे
हत्ती बुडतो अन् शेळी ठाव मागते जेथे भलेभले हात टेकतात तेथे लहान बडेजाव दाखवितात
हात ओला तर मित्र भला म्हणजेच तुमच्या पासून काही फायदा होणार असेल तर लोक तुमचे गोडवे गातात
हात फिरे तिथे लक्ष्मी वसे उद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते
हातच्या काकणाला आरसा कशाला स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको
हाजिर तो वजीर जो ऐन वेळेला हजर असतो त्याचाच फायदा होतो
हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे जे आपल्या हातात आहे ते सोडून दुसरे मिळेल या आशेने हातातली सोडण्याची पाळी येणे
हिरा तो हिरा गार तो गार गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्यावाचून राहत नाहीत
हिऱ्या पोटी गारगोटी चांगल्या च्या पोटी नाठाळ
होळी जळाली आणि थंडी पळाली होळीनंतर थंडी कमी होते
श्रीच्या मागोमाग ग येतो संपत्तीबरोबर गर्व येतो
No comments:
Post a Comment