वळणाचे पाणी वळणावर जाणे निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहणार
वरातीमागून घोडे योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे
वारा पाहून पाठ फिरविणे परिस्थिती पाहून वर्तन करणे
वाहत्या गंगेत हात हात धुणे किंवा आपल्या तव्यावर पोळी भाजून घेणे सर्व साधने अनुकूल असली की होईल तो फायदा करून घेणे
वासरात लंगडी गाय शहाणी मूर्ख माणसा अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ असतो
वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातोच वाईट व्यक्तीला चांगली म्हंटले किंवा वाईट तरी त्रास द्यायचा तो देणारच
विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर गरजेपुरते गोष्टी घेऊन फिरणे
विशी विद्या तिशी धन योग्य वेळेत योग्य कामे केली की त्यावरून कर्तुत्वाचा अंदाज बांधता येतो
विचाराची तूट तेथे भाषणाला उत मूर्खांच्या गर्दीत नेहमी नुसती बडबड असते
विश्वासही ठेवला घरी चारी सुना गरवार करी विश्वासघात करणे
No comments:
Post a Comment