Saturday, 16 January 2021

म्हणी १३

तितका संताप कामाचा पसारा जितका अधिक तितकी जबाबदारी अधिक असणे
शहाण्याला शब्दाचा मार शहाण्या माणसाला त्याच्या चुकी बाबत शब्दांनी समज दिली तरी ते पुरेसे असते
शितावरून भाताची परीक्षा वस्तूच्या लहान भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा होती
शेरास सव्वाशेर चोरावर मोर एकाला दुसरा वरचढ भेटणे
शेजी देईल काय आणि मन धायेल काय ? शेजारणीने एखादा पदार्थ सढळ हाताने करून दिला तरीच मनाची तृप्ति होऊ शकत नाही
शेजीबाईची कढी, धावधाव वाढी एकाची वस्तू घेऊन दुसऱ्यावर उपकार दाखविणे
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी चांगल्या च्या पोटी चांगल्याच गोष्टी येतात
सगळेच मुसळ केरात मुख्य महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम वाया जाणे
सरड्याची धाव कुंपणापर्यंतच प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती वा वकूब यांची मर्यादा पडते
समर्थाघरचे श्वान त्याला सर्व देती मान मोठा च्या घरच्या शूद्रालाही मान द्यावा लागतो
संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे
संग तसा रंग संगती प्रमाणे वर्तन असणे
सारा गांव मामाचा एक नाही कामाचा जवळच्या अशा अनेक व्यक्ती असणे पण त्यापैकी कोणाचाच उपयोग न होणे
साप साप म्हणून भुई धोपटणे संकट नसताना त्याचा अभ्यास निर्माण करणे
सात हात लाकुड नऊ हात ढलपी एखादी गोष्ट खूप फुगवून सांगणे
सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी एकदम अशक्य कोटीतील गोष्ट करणे
सुरुवातीलाच माशी शिंकली आरंभालाच अपशकून
सुंभ जळाला तरी पीळ जात नाही वैभव गेले तरी ताठा जात नाही
स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडे वरवरच्या अवडंबराने पुण्य मिळत नाही

No comments:

Post a Comment