दिनांक १४ मे, २०२१
🔹आजचा विचार'🔹
*आपल्या जीवनात सणांचे खूप महत्त्व आहे. सण हे केवळ मनोरंजनाचे साधन नसतात; परंतु त्यामागे सांस्कृतिक, धार्मिक आणि राष्ट्रीय भावना लपलेल्या आहेत.*
*रमजान महिना म्हणजे प्रार्थना आणि रोजा (उपवास) करण्याचा महिना. मुस्लिम धर्मातील पाच मूळ तत्वांपैकी रोजा एक तत्व आहे.*
*रमजान महिन्यातच पवित्र कुराण या ग्रंथातील सुरुवातीची वचनं लिहिली गेली, अशी मुस्लिम धर्मियांमध्ये मान्यता आहे. त्यामुळेच या काळात कुराण पठण करण्यावर अधिक भर दिला जातो. शिवाय रोजा करणं हा प्रार्थना करण्याचा, अल्लाहच्या जवळ जाण्यासाठीचा एक मार्ग असल्याची मुस्लिम बांधव मानतात.*
*आरोग्य आणि स्वयंशिस्त उत्तम राहण्यासाठीही रोजा करणं चांगले असल्याचं म्हटले आहे.*
*रमजान महिन्यात पहाटे सूर्य उगवण्याच्या आधीच जेवण केलं जाते. त्याला सहरी म्हणतात; तर रात्री सुर्यास्तानंतर जेवण करून रोजा सोडतात त्यास इफ्तार म्हणतात.*
*वर्षाच्या शेवटी आपल्याकडं शिल्लक वस्तू अगर रक्कम असेल, त्यांच्या अडीच टक्के रक्कम दान केली जाते त्याला जकात कर (धार्मिक कर) म्हणतात. रमजानच्या काळात व ईदची नमाज अदा करण्यापूर्वी गरिबांना दान (खैरात) स्वरुपात काही तरी देण्याची परंपरा आहे.*
*संयम, सदाचार याचं पालन करून अल्लाह सोबतचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी हा सण महत्त्वाचा आहे.*
*अक्षय्यतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवसाने एका कालाचा अंत आणि दुसऱ्या युगाचा प्रारंभ, अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय (अक्षय्य) तृतीया या संपूर्ण दिवसाला 'मुहूर्त' म्हणतात. अक्षय म्हणजे क्षय न होणारं; म्हणूनच या दिवशी केलेलं शुभ कार्याचे फळ अक्षय टिकते असे मानले जाते. या तिथीला श्री विष्णूसहित वैभव लक्ष्मीची पूजा, होमहवन, दान-धर्म, जपजाप्य आदी धर्मकृत्ये केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो असे मानले जाते.*
*आज १४ मे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती. छत्रपती संभाजीराजे हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, समाजकारण, राजकारण, अर्थकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा.*
*देश धरमपर मिटनेवाला*,
*शेर शिवाका छावा था|*
*महापराक्रमी परम प्रतापी, एकही शंभू राजाचा था|*
*याच दिवशी महात्मा बसवेश्वर यांची जयंती असते. सर्व जाती धर्मांतील नेमक्या तत्त्वांची निवड करून त्यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली.*
*सणांचे महत्त्व, त्यांचा इतिहास, ते साजरे करतांना करायची पूर्वसिद्धता आणि घ्यावयाची काळजी, सण साजरे केल्याने होणारे लाभ आदींची माहिती आपणास हवी.*
*प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळे सण साजरे केले जात असले, तरी सर्व सणांचे उद्दिष्ट एकच आहे.*
*सण साजरे करण्यास प्रत्येक धर्मामध्ये आध्यात्मिक आधार आहे. बदलते ऋतुमानानुसार पोषक खाद्य पदार्थ त्या-त्या सणालाच बनविले जातात. म्हणून त्यातून चैतन्य निर्मिती होऊन प्रत्येकाला नियंत्याकडे जाण्यास साहाय्य होते. बंधुभाव व राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागते. संस्कृती जपली जाते. राष्ट्रीय सणातून व थोरांच्या जयंतीतून आपणास अनेक ऐतिहासिक राष्ट्रीय घटनांच्या अमर आठवणी स्मरण करत असतो. या घटना आपल्याला प्रेरणा आणि संदेश देतात. त्यातून आपणास आपल्याला स्वाभिमान आणि स्वदेशप्रेमाची प्रेरणा मिळते. तसेच शरीर स्वास्थ्य टिकवण्यासाठी सण साजरे करणे महत्त्वाचे वाटते.*
*सर्वांना रमजान ईद व अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!*
*छत्रपती संभाजी महाराज जयंती, महात्मा बसवेश्वर जयंती आणि परशुराम जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!*
💐💐💐💐💐💐💐
No comments:
Post a Comment