आजच्या जीवनशैलीत शारीरिक परिश्रमाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. मोटर सायकलचा वापर जास्त असल्याने पायी चालणे होत नाही. घरात देखील सर्व गोष्टी रिमोटद्वारे (टीव्ही,एसी) चालू-नियंत्रित-बंद केल्या जातात. वाॅशिंग मशीन, कुकर, फूड प्रोसेसर, कणीक मळण्याचे यंत्र, पोळी तयार करण्याचे यंत्र इत्यादीचा वापर होत असल्याने शरीर सुखासीन बनत चालले आहे व त्यासोबत आपला ताण-तणाव वाढत आहे. अशा स्थितीत श्रमाच्या तुलनेत गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्यामुळे वजन वाढणे, अपचन, कंबर-गुडघे दुखी, शुगर, रक्तदाब यासारख्या व्याधींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
आयुर्वेदात 'नि: सुखत्वं सुखायच!' हा महत्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे, याचा अर्थ सुखासाठीच सुखकारक गोष्टींचा त्याग करणे; म्हणजेच अंगमेहनतीची कामे करणे, व्यायाम करणे, परिश्रम करणे इत्यादी गोष्टी सुखी जीवनासाठी आवश्यक आहेत.
रोग होऊन त्याच्या वेदना सहन करण्यापेक्षा रोग होऊच नये यासाठी आपण काळजी घेणे गरजेचे आहे. (Prevention is better than cure)*
आपले प्रत्येक काम करण्यासाठी व्यक्त्ती नेमता येतील; परंतु आपल्या वाट्याचा व्यायाम करण्यासाठी बदली व्यक्त्ती नेमता येत नाही, त्यासाठी आपणच आपला व्यायाम करावा लागेल. सरासरी आयुष्यमान घटत जाण्यापूर्वी सावध होण्याची वेळ आली आहे. दिवसातून एकदातरी शरीरातून घाम बाहेर पडला पाहिजे. यासाठी दररोज कष्टाची कामे केली पाहिजेत किंवा व्यायाम करुन आपणच आपले जीवन निरोगी ठेवले पाहिजे.
💐💐💐💐💐💐💐
No comments:
Post a Comment