. *नाते*
कुणी विचारते मला
कोण लागते ती तुझी
जीव ओवाळून सदा
टाकतोस तिच्यापायी
काय सांगावे कळेना
कसे बोलावे कळेना
कन्या सखी माय अशी
किती नाती तिच्या ठायी
जन्म देतो तिला जेव्हा
तेव्हा असते ती कन्या
वाचताना भान हर्पे
माझी प्रियतमा सखी
कवी म्हणून देतसे
जन्म मला जेव्हा-केव्हा
माय माझी होते तीच
साथ देते सुख-दु:खी
*______रमेश*
No comments:
Post a Comment