Wednesday, 2 June 2021

विचार मंथन-५६

        वृद्ध माता-पिता, आजी-आजोबा अनुत्पादक. म्हणून ते निरुपयोगी अशी विचारांतील गल्लत मुळीच करू नका. त्यांनीही आपल्या उमेदीच्या काळात हाडांची काडं केली होती. घर आणि समाजासाठी काही थोडं केलेलं होतं. आजही ते उत्पादक गटात नसले तरी त्यांचे अनुभवाचे बोल, सल्ले आपले श्रम, वेळ आणि अर्थ थोडेफार वाचवण्याचे काम नक्कीच करतात. 
        यासाठी त्यांना जपायला हवंच. निदान त्यांच्यामुळेच हे जग पाहायला मिळाले या कृतज्ञतेपोटी.

No comments:

Post a Comment