. *प्रश्न म्हणजे काय?*
ही अशी एक अवस्था असते जेव्हा आपल्यासमोर समस्या आलेली असते आणि ती सोडविण्यासाठी मार्ग मात्र नाही असे वाटते. या अवस्थेलाच प्रश्न किंवा समस्या म्हटले जाते.
जगायला खूप कमी लागतं. दाखवायला आणि मिरवायला मात्र खूप लागते. ही दाखवण्याची आणि मिरवण्याची हौस ज्याच्याकडे जास्त त्याच्याकडे प्रश्न जास्त.
*'चित्ती असू द्यावे समाधान.* असे म्हणून जे व जितके उपलब्ध आहे त्यावरच पुढील जीवनप्रवास सुरू करणे केव्हाही उत्तमच. स्वप्ने जरुर बघावीत पण ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते हे लक्षात घेऊनच. समाधानी वृत्तीने असा जीवनप्रवास सुरू केल्यानंतर आणखी काय हवे आहे त्या उपायांची मालिकाच आपल्यासमोर दिसेल पण तेवढा धीर करायला हवा.
नवीन काही खरेदी करताना गरज→आवश्यकता→प्राधान्यक्रम→उपलब्ध साधने→अन्य पर्याय→अचूक निवड→अर्थ पुरवठा →समाधान असा काही स्वतःचा क्रम तयार करून घेणे आवश्यक असते.
भूक हा एक प्रश्न घेतला तर तिची तीव्रता, घरी पोहचावयास लागणारा वेळ, जवळपासचे उपाहारगृह, फळे किंवा ड्रायफ्रुटस् शक्य आहे का? खिशाची किंवा डेबिट/क्रेडिट कार्डची स्थिती, त्या ठिकाणचे पदार्थ खाण्याचा स्वत:चा किंवा इतरांचा अनुभव अशा पद्धतीने अधिकाधिक बाबींमध्ये सकारात्मक प्रतिसाद असेल तर निर्णय घ्यावा.
No comments:
Post a Comment