. *आई*
सावली दुपारी
रणरणत्या वणव्यात
गारवा झळांती
घेऊन ये जशी रात
शिडकावा मंद
जळाचा हवाहवासा
की वारा कोमल
स्पर्शून जाई जरासा
मिटुनी तहान
भूकही निघुनी जाते
ती साद आईची
मन वाऱ्यावर झुलते
आहेच स्वामी तो
तिन्ही जगांचा राणा
ज्या लाभे व्हावया
लीन मायच्या चरणा
*रमेश*
No comments:
Post a Comment