एखाद्या माणसाचा स्वभाव चांगला असो वा वाईट, तो बदलण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो सहजासहजी बदलत नाही; कारण अनेक वर्षांच्या संस्कारांनी तो घडत आलेला असतो.
त्या माणसाबद्दल आपणास आत्मियता असेल तर प्रथम त्यांच्या विचारांत क्रांती घडवावी लागेल. एक-दोन वेळा सांगून, प्रयत्न करून भागणार नाही. सातत्याने पाठपुरावा करावा लागेल.
त्यानंतरही जशी त्याची इच्छा असेल हा भाव ठेेवून सभोवतालचे वातावरणात सकारात्ममक ठेवण्याचा, सुंभ जळला तरी पीळ जात नाही असा विचार न करता ढवळ्याजवळ बांधला पवळा किंवा दगडालाही पाझर फुटेल अशा अपेक्षा ठेवून सातत्यानेेे सद्ववर्तनी व्यक्तीचा सहवास लाभेल असा अथक प्रयत्न केला पाहिजे.
No comments:
Post a Comment