*माझे मत*
ज्याला वाचन करावयाचे आहे तो कोणी पुस्तके भेट देण्याची वाट बघत नाही. विकत घेऊन / ग्रंथालयातून आणून वाचत असतो. आणि भेट म्हणून मिळालेली पुस्तके 100% वाचली जातीलच याची खात्री काय? *त्यामुळे बुके नको बुक द्या* असे म्हणायची आवश्यकता नाही. त्या-त्या व्यवसायात गुंतलेल्या कामगारांची, व्यापाऱ्यांची मानसिकताही आपण बघायला पाहिजे. फुले, हार, बुके बनविणारे कुणी फार मोठे व्यापारी नसतात. शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचे संसार त्यावर अवलंबून असतात. याउलट पुस्तक निर्मिती करणारे प्रकाशक आणि त्यांचा व्यवसाय याबाबत माहिती घेतली तर निर्मिती खर्च आणि विक्री किंमत यात जमीन अस्मानाचा फरक आढळतो. नफा मिळवण्याच्या दृष्टीने आज-काल हा व्यवसाय चालवला जातो. ग्रंथ प्रसाराचा हेतू ठेवणारे अगदी मोजके लोक आहेत.
माणसाच्या प्राथमिक गरजांबरोबरच अन्न, पुस्तक आणि फुले यांचे महत्त्व आहे. अन्न शारीरिक क्षमता विकसित करते पुस्तक बौद्धिक क्षमतेचा विकास करते आणि फुले भावनिक विकास घडवतात.
*© चंद्रकांत*
No comments:
Post a Comment